Psalms 10

1हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस?
संकटसमयी तू स्वत:ला का लपवतोस?
2कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो,
परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो.
3कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो;
लोभी परमेश्वराला तुच्छ मानतो आणि नाकारतो.

4दुष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, ह्यास्तव तो देवाला शोधत नाही.

कारण देवाबद्दल त्याला काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही.
5त्याचे मार्ग उन्नंतीचे असतात,
परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत,
तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो.

6तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही;

संपूर्ण पिढ्यात माझ्यावर आपत्ती येणारच नाही.
7त्याचे मुख शाप, कपट, जुलूम, हानिकारक शब्दांनी भरले आहेत.
त्यांची जीभ जखमी व नाश करते.

8तो गावाजवळ टपून बसतो,

गुप्त ठिकाणात तो निर्दोष्याला ठार मारतो;
त्याचे डोळे लाचारावर टपून असतात.
9जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो.
तो दीनाला धरायला टपून बसतो.
तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो.
10त्याचे बळी पडणारे ठेचल्या आणि झोडल्या जातात.
ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात.

11तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला,

त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही.
12हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव.
गरीबांना विसरु नकोस.

13दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो?

14तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो,
लाचार तुला आपणास सोपवून देतो,
तू अनाथांचा वाचवणारा आहे.

15दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक,

त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्याला जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही.
16परमेश्वर सदासर्वकाल राजा आहे,
राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत.

17हे परमेश्वरा, पीडितांची तू ऐकली आहे;

तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे.
पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे,
म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये.
18

Copyright information for MarULB